Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याभीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप

भीमा-पाटस प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट; संजय राऊतांनी केले होते आरोप

मुंबई । Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 एप्रिलला मुंबईतील सीबीआय मुख्य कार्यालयाला पत्र पाठवून भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul kul) यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिगचा आरोप केला होता. या प्रकरणाचा लेखी अहवाल आता चौकशी समितीकडून देण्यात आला आहे. चौकशी समितीच्या लेखी अहवालानंतर आता आमदार राहुल कुल यांना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्यात राज्य शासनाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पुणे तालुका दौंडा येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तसेच राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. मात्र साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही. २०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाहीये मात्र २०२१-२२ लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने आपल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. तसेच इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिका-यांची नेमणूक केली असून अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे.

August 2023 Bank Holidays : बँकांशी संबंधित कामे करून घ्या; ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, राहुल कुल हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे आता या क्लिन चीटनंतर संजय राऊत नेमके काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या