Tuesday, September 17, 2024
HomeराजकीयAjit Pawar : भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे; महायुतीमध्ये वादाची...

Ajit Pawar : भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे; महायुतीमध्ये वादाची ठिणगी?

पुणे | Pune

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वात जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) काढण्यात आली आहे. ही यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली आहे. मात्र, या ठिकाणी अजित पवारांना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसोबतच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या रोषाचाही सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज जुन्नरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगलखाेर निघाला ‘एमडी’ डिलर; शहरात दाेन टाेळ्यांचे रॅकेट उघड

भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके (Aasha Buchke) यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.अजित पवारांनी घटक पक्षांना डावलून पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करते, असे म्हणत आशा बुचकेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. अजित पवारांचा ताफा ज्या ठिकाणावरुन बैठकीचे आयोजन करण्यात आलेल्या सभागृहात जात होता त्याच मार्गावर हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर – पालकमंत्री भुसे

दरम्यान, आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघासाठी (Ambegaon-Shirur Assembly Constituency) होणाऱ्या महायुतीच्या बैठकीवर शिंदेंच्या शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण असे नामकरण करुन अजित पवार गटाकडून चुकीचा प्रसार करण्यात येत आहे, यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी शिवसैनिकांनी महायुतीच्या या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या