Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : “...पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार...

VIDEO : “…पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही”; प्रसार लाड यांनी अरविंद सावंतांना दिली थेट ‘वॉर्निंग’

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीच्या दर्शनाने सुरूवात केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. परंतु, बावनकुळे यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले. पण अरविंद सावंताच्या प्रत्युत्तरा भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले. पण प्रत्यत्तर देताना “अरविंद सावंत साहेब, आता मी तुम्हाला साहेब म्हणतोय. पण तुम्ही जर पुन्हा अशी चूक केलीत तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही”, असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला.

- Advertisement -

“काल-परवापर्यंत घरी बसलेले, झोपी गेलेले आता जागे झालेत आणि दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत साहेबांची झाली आहे. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलावे ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. अरविंद सावंत साहेब, आता मी तुम्हाला साहेब म्हणतोय. पण तुम्ही जर पुन्हा अशी चूक केलीत तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,” असे सक्त ताकीदच आमदार प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांनी दिली.

…अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो; नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत हे काय बोलून गेले..

“सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे,” असे ट्वीट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली होती. चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे नसून ‘खुळे’ आहेत, अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत यांनी बावनकुळेंवर टीका केली. तसेच, भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. त्यांनी कोणावरही टीका करू नये, असा पलटवारही उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या