Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपचे मिशन 'मुंबई १५०'

भाजपचे मिशन ‘मुंबई १५०’

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आपल्या ‘मिशन १५०’ च्या उद्दिष्टची आखणी करण्याकरिता भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड.आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत १५० जागा जिंकण्यावर चर्चा होणार आहे.

कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे मुंबईतील खासदार, आमदार, मुंबई पदाधिकारी, प्रवक्ते, मुंबई कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित, मुंबईत राहणारे प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रीय परिषद सदस्य, मोर्चा, सेल, आघाडी नगरसेवक तसेच जिल्हा अध्यक्ष आणि महामंत्री यांना बोलावण्यात आलेले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी ठाकरे गट आणि भाजप यांच्यात सामना होणार आहे. मुंबई पालिकेत २२७ नगरसेवक संख्या आहे. भाजपने १५० नगरसेवक निवडून आणण्याचे ठरवले आहे. त्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून तयारी सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ओबीसी आरक्षण, वाॅर्ड रचना, नगरसेवक संख्या यावरुन मुंबई महापालिकेची निवडणूक गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या २२७ नगरसेवकांच्या संख्येला सध्या सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने आव्हान दिलेले आहे. यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे डिसेंबर-जानेवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होतील, असा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या