Friday, October 11, 2024
Homeक्रीडाब्लॅकमेलिंगसाठी डॉक्टरवर गोळीबार

ब्लॅकमेलिंगसाठी डॉक्टरवर गोळीबार

पोलिसात गुन्हा दाखल || माळीवाड्यात घडली होती घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माळीवाडा परिसरात मार्केटयार्ड रस्त्यावर बुधवारी (दि. 10) सायंकाळी एकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यासाठी व त्याला भीती बसावी यासाठी हा गोळीबार झाल्याचे फिर्यादीनुसार स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी राजेंद्र बहुधने (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

राजेंद्र बहुधने यांनी फिर्यादीत म्हटले आहे, सिराज दौलत खान याने कट रचून तारकपूर बसस्थानक येथून बळजबरीने त्याच्या इनोव्हा गाडीत बसवून डॉ. प्रदीपकुमार तुपेरे यांच्या नवोदय क्लिनिक येथे नेऊन व तेथून त्यांना बरोबर घेऊन संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सिराज खान याच्या माळीवाड्यातील मशिरा फिश अ‍ॅड बर्ड हाऊस येथे आणले. डॉक्टरांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या मनात सिराज खान याच्याबाबत भीती बसावी म्हणून तसेच डॉक्टरांनी पैसे देण्याचे बंद केले म्हणून त्याचा राग मनात धरुन ही घटना घडली. यावेळी फिर्यादी यास लाथाबुक्क्याने मारहाण करुन सिराज खान याने मुलाला दुकानात असलेली बंदुक आणण्यास सांगितले. या बंदुकीचा फिर्यादीस धाक दाखवून दुकानात हजर असलेला निसार याच्याकडून बंदुक लोड करुन घेवुन फिर्यादी यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने 5.15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या दिशेने फायरिंग केली.

ही गोळी दुकानावरील फरशीवर लागल्यानंतर आरोपीने पुन्हा निसार याच्याकडून लोड करुन ही बंदुक फिर्यादी यांच्या हातात देवून डॉक्टर तुपेरे यांना सांगितले की, तू आता पोलिसांना सांगायचे की राजेंद्र बहुधने याने मला माराण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे. आरोपी त्यावेळी म्हणाला की, मी रेकॉर्डवरील आरोपी आहे. तू आता पोलिसांना सांगायचे की यातील फिर्यादी बहुधने याने मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे व तसे न सांगितल्यास तुला धंद्याला लावून टाकीन. त्यामुळे डॉक्टर घाबरले व शांत बसले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिराज दौलत खान, निसार व एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या