नवी दिल्ली | वृत्तसंस्था
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याविरोधात भारता कडून ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानमधील ९ ठिकाणचे दहशतवादी ठिकाणे उध्वस्त केल्या नंतर आज पुन्हा पाकिस्तान कडून भारतीय १५ ठिकाणांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झालेत परंतु भारतीय लष्काराने ते ड्रोन हल्ले परतून लावत पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले. त्याच बरोबर भारताने पाकिस्तानमधील लाहोर येथील लष्करी रडारयंत्रणा हल्ला करून उध्वस्त केली आहे. आज सायंकाळी पाकिस्तानकडून जम्मू विमान तळावर मिसाईल्स हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाब, राजस्थान आणि जम्मू येथे हल्ल्याचा पाकिस्तान कडून प्रयत्न झाला आहे.राजस्थान मध्ये पाकिस्तानचे F-16 हे विमान भारतीय सेनेने पाडले आहे.
दरम्यान यात ८ ड्रोन हल्ले भारतीय सेने कडून पाडण्यात आले आहे. दरम्यान जम्मू मध्ये भारतीय एअर डिफेन्स सर्विसने कमाल दाखवत पाकिस्तानचे मिसाईल पाडले आहेत.
दरम्यान आताच पठानकोट मध्ये देखील ब्लॅॅक आउटकरण्यात आले आहे.पंजाब मधील देखील पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवून लावला आहे. भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीम ने ड्रोन हल्ले परतवून लावले आहे.