Friday, May 3, 2024
Homeनाशिकउद्या जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिरांचे आयोजन

उद्या जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिरांचे आयोजन

नाशिक । Nashik
जिल्हा परिषद मुख्यालयात मंगळवारी (दि.१५)नाशिक जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोवीड – १९ या रोगामुळे निर्माण झालेली आपत्ती यामुळे महाराष्ट्र राज्यात सरकारी व खाजगी रक्तपेढयांमध्ये रक्तसाठयाचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. राज्यातील गरजु लाभार्थ्यांना रक्ताची निकड तात्काळ भागविण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदात्यांनी रक्तदान करण्याबाबत अवाहन केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर जास्तीत जास्त रक्तदान शिबीरे आयोजीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

त्यानुसार नाशिक जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावर मंगळवारी (दि.१५)नाशिक जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यात पंचायत समिती स्तरावर दिनांक ३१ डिसेंबरअखेर तालुका स्तरावर टप्प्या टप्प्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीरात जिल्हा परिषदेचे विविध विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे ,असे अवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या