Tuesday, February 3, 2026
Homeमहाराष्ट्रBMC Election 2026: महायुतीला धक्का! रामदास आठवलेंचा स्वबळाचा नारा, ३९ उमेदवारांची यादी...

BMC Election 2026: महायुतीला धक्का! रामदास आठवलेंचा स्वबळाचा नारा, ३९ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ओढाताणीनंतर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. भाजपने आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करत आठवले यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून ३९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

जागावाटपाच्या चर्चेत रिपाईला सात जागा देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाही महायुतीने जाहीर केलेल्या याद्यांमध्ये रिपाईच्या एकाही उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातून जागा देण्याचे निर्देश दिले होते, तरीही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल न झाल्याने रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमच्याशी विश्वासघात झाला असून, आता स्वबळाशिवाय पर्याय नाही,” अशा स्पष्ट शब्दांत आठवले यांनी आपली भूमिका मांडली.

YouTube video player

मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी मतदारांची संख्या निर्णायक आहे. आतापर्यंत हा मतदार रामदास आठवले यांच्या आवाहनामुळे महायुतीच्या पाठीशी उभा राहत होता. मात्र, आता रिपाईने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने दलित मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत १०० ते २०० मतांचा फरकही उमेदवाराचे भवितव्य ठरवू शकतो. अशा स्थितीत रिपाईच्या या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

रामदास आठवले यांनी जाहीर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत मुंबईच्या विविध भागांतील महत्त्वाच्या वॉर्डांचा समावेश आहे. त्यातील नावे खालीलप्रमाणे आहेत:

  1. स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
  2. रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
  3. बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
  4. सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
  5. रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
  6. दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
  7. ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
  8. प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
  9. संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  10. संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
  11. निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
  12. गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
  13. विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
  14. मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
  15. श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
  16. मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  17. नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
  18. सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
  19. विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
  20. नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
  21. विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
  22. रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
  23. राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
  24. हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
  25. राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
  26. भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
  27. सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
  28. यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
  29. अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
  30. रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
  31. छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
  32. अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
  33. जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
  34. बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
  35. वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
  36. राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
  37. प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
  38. धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
  39. शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150

रिपाईच्या या अनपेक्षित निर्णयामुळे महायुतीच्या गोटात खळबळ माजली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष दुरावणे महायुतीला परवडणारे नाही. आता भाजपचे वरिष्ठ नेते रामदास आठवले यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की रिपाई आपल्या निर्णयावर ठाम राहून महायुतीला निवडणुकीत ‘रिटर्न गिफ्ट’ देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...