मुंबई | Mumbai
महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युती केली आहे. शिवसेना ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्यापूर्वीच आपल्या उमेदवारीवर कॉन्फिडंट असलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अद्याप तिकीट मिळाले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या ७५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये किशोरी पेडणेकरांचे नाव नाही. पक्षाच्या एबी फॉर्मसाठी किशोरीताई अद्याप वेटींग लिस्टवर असल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून 40 पेक्षा जास्त शिवसैनिकांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. यानंतर पेडणकेर या मातोश्रीवर दाखल झाल्या असून उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले असले तरी त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकच संभ्रम वाढला आहे.
ज्या वॉर्ड क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर यांचे प्रतिनिधित्व राहिले आहे, त्या वॉर्डसंदर्भातही हालचाली वाढल्या आहेत. शाखा क्रमांक १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे यांची मातोश्रीवर उपस्थिती नोंदवण्यात आली. यामुळे वॉर्ड १९९ साठी नव्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा संधी दिली जाणार की नव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईत १३० हून जास्त जागा मिळतील असे काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी स्वतःची उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना अद्याप उमेदवारी देण्यात आली नाही.
हे ही वाचा: मुंबईत शरद पवारांना मोठा धक्का; राखी जाधवांची राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला सोडचिठ्ठी
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९९ मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. आता या वॉर्डमध्ये तरुण चेहरा दिला जातो की पुन्हा किशोरी पेडणेकरांनाच तिकिट दिले जाते हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.
ठाकरे गटाकडून या उमेदवारांना देण्यात आले एबी फॉर्म
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
७) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
८) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
९) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
१०) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
११) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१२) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
१३) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
१५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
१६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
१८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
१९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२१) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
२३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
२४) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
२५) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
२६) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
२७) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
२८) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
२९) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
३०) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
३१) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
३२) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
३३) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
३४) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
३५) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
३६) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
३७) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
३८) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
३९) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
४०) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
४१) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
४२) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
४३) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
४४) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
४५) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
४६) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
४७) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
४८) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
४९) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
५०) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
५१) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
५२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
५३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
५४) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
५५) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
५६) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
५७) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
५८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
५९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
६०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
६१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
६२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
६३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
६४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
६५) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
६६) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
६७) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
६८) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
६९) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
७०) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
७१) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
७२) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
७३) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
७४) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
७५) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख




