पंचाळे | वार्ताहर Panchale
सिन्नरच्या पूर्व भागातील श्रीरामपूर ( शिंदेवाडी ) येथे विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पंचाळे पासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या श्रीरामपूर शिंदेवाडी फाट्यावर शिवाजी गेनू विशे राहणार नाशिक यांची स्वतःची मोठी विहीर आहे .सध्या पुरचाऱ्यांचे पाणी सुरू असल्याने या विहिरीच्या वरच्या बाजूस मोठा बंधारा असल्याने या पाण्यामुळे या विहिरीत पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला आहे.
आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता काही कामगार काम करत असताना त्यांना या विहिरीत एक मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याला माहिती दिली. त्या शेतकऱ्याने श्रीरामपूरचे पोलीस पाटील शांताराम कोकाटे यांना कळविले. पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलीसांना याबाबत तातडीने माहिती दिली.
या मृतदेहाच्या अंगावर चौकटी निळा शर्ट असून जीन्स पॅन्ट घातलेली आहे या पॅन्टच्या खिशात एक सफेद रुमाल सापडलेला आहे. मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. साधारणतः दहा-पंधरा दिवसापूर्वी येथे ही घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील किंवा अन्य जिल्ह्यातील मिसिंग केस चा अभ्यास करून तसेच याबाबत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटणे त्याचे वय व इतर माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.




