Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

शहरातील सोयगाव भागातील ३५ वर्षीय बेपत्ता तरूणाचा मृतदेह बालाजी लॉन्स जवळील विहिरीत आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

समाधान कृष्णा पवार (३५, रा. इंदिरानगर, सोयगाव) हे मृत युवकाचे नाव आहे.तो गेल्या चार – पाच दिवसापासून बेपत्ता होता. समाधान चा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता अखेर यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी कॅम्प पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार दाखल केली होती.

YouTube video player

दरम्यान सटाणा रस्त्यावरील बालाजी लॉन्स नजीकच्या विहिरीतून वास येत असल्याने काही नागरिकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत एक मृतदेह असल्याचे समजले. पोलिसांनी महापालिका अग्नीशमन दलाच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढला असता तो समाधान पवार याचा असल्याचे निदर्शनास आले.

समाधान गेल्या चार दिवसापूर्वीच विहीरी पडला असावा. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. अग्निशमन दलाचे जवान शकिल तैराक, रफिक खान, बाळू बच्छाव, विकास बोरगे, जयेश सोनवणे, कीरण सोनवणे यांनी समाधानचा मृतदेह विहीरी बाहेर काढला. कॅम्प पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...