Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana: राज्यात बोगस 'लाडक्या' बहिणींचा सुळसुळाट; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक...

Ladki Bahin Yojana: राज्यात बोगस ‘लाडक्या’ बहिणींचा सुळसुळाट; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी

पुणे | Pune
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी मिळून आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र ‘लाडक्या बहिणीं’ची पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यभरात २६ लाख ३४ हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली असल्याचे आता समोर आले आहे.

राज्यात २६ लाख ३४ हजार बोगस लाडक्या बहिणी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत राज्यातील २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर उर्वरित ११ लाख अर्जांची पात्रता तपासण्यात आल्यानंतर त्यात ७ लाख ७६ हजार अर्ज छाननीत बाद ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा सखोल आढावा घेण्याचे ठरवले. महिला व बालकल्याण विभागाने सर्व विभागांकडून माहिती मागविल्यानंतर फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला.

- Advertisement -

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक फसवणुक?
या २६ लाख ३४ हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’मध्ये शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात १ लाख, २५ हजार ३००, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख २५ हजार ७५६, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे मंत्रीपद भूषविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एक लाख, ८६ हजार ८००, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख, ४ हजार ७००, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख १४०० तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यात एक लाख १३ हजार अपात्र म्हणजेच बोगस लाभार्थी आढळून आले आहेत.

YouTube video player

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ९५ हजार ५००, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये ६३ हजार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात ७१ हजार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लातूरमध्ये ६९ हजार अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यात १ लाख चार हजार, साताऱ्यात ८६ हजार, सांगलीत ९० हजार, पालघरमध्ये ७२ हजार, नांदेडमध्ये ९२ हजार, जालनामध्ये ७३ हजार, धुळे ७५ हजार, अमरावतीमध्ये ६१ हजार बोगस लाभार्थ्यांनी सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फसवणुकीचे धक्कादायक प्रकार
फसवणुकीच्या पद्धतीही धक्कादायक आहेत. काही प्रकरणांत सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेत नोंदणी केली, तर अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केले. आणखी आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज दाखल करून लाभ घेतल्याचे समोर आले. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार ही गंभीर बाब सरकारच्या लक्षात आली आणि त्यानंतर लगेचच कारवाई करण्याचे ठरले. त्यामुळे जूनपासून २६ लाख ३४ हजार अपात्र ‘बहिणीं’चा निधी रोखण्यात आला आहे. सरकारकडून सर्व पात्र महिलांची पुन्हा ई-केवायसीद्वारे तपासणी केली जाणार असून, खऱ्या लाभार्थ्यांनाच पुढे निधी दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...