Friday, April 25, 2025
HomeनगरCrime News : बाप-लेकाच्या अंगावर उकळते तेल फेकले

Crime News : बाप-लेकाच्या अंगावर उकळते तेल फेकले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बापासह सात वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर उकळते तेल टाकून जखमी केल्याची घटना बोल्हेगाव, गांधीनगर परिसरातील मारोती मंदिरा जवळ घडली. दिलीप हंसाराम माली (वय 26) व त्यांचा मुलगा हिमांशु जखमी झाला आहे. जखमींवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलीप यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (9 एप्रिल) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. महेशकुमार लाल सैनी (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (8 एप्रिल) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात दिलीप माली यांनी दिलेल्या जबाबानुसार, रात्री अचानक महेशकुमार याने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून मालकाने बोलावले आहे असे सांगितले.

- Advertisement -

दरवाजा उघडताच महेशकुमारने आपल्या घरातून गरम करून आणलेले तेल मग्यातून त्यांच्या अंगावर फेकले. या घटनेत दिलीप यांचा 7 वर्षीय मुलगा हिमांशू हाही किरकोळ जखमी झाला आहे. सदरची घटना घडल्यानंतर महेशकुमार घटनास्थळावरून पळून गेला. रात्री 9.30 वाजता घराजवळ कचरा टाकण्याच्या कारणावरून दिलीप माली व महेशकुमार यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून महेशकुमार याने हे कृत्य केले असावे, असा संशय दिलीप माली यांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर दिलीप माली यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार इनामदार तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...