Friday, April 25, 2025
Homeक्राईमबोल्हेगाव परिसरातील दारूअड्डे पोलिसांनी जेसीबीने केले उद्ध्वस्त

बोल्हेगाव परिसरातील दारूअड्डे पोलिसांनी जेसीबीने केले उद्ध्वस्त

तोफखाना पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बोल्हेगाव, गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी तोफखाना पोलिसांनी थेट जेसीबीच्या सह्याने कारवाई करीत उद्ध्वस्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

- Advertisement -

बोल्हेगाव रस्ता, भारत बेकरी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अतिक्रमण करून अवैध धंद्दे चालविले जात होते. त्यातून अनेक गुन्हेही घडत होते. याबाबत काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. याची दखल घेत तोफखाना पोलिसांनी खात्री केली. शनिवारी सायंकाळी पोलिस जेसीबीसह बोल्हेगावात पोहोचले. रस्त्याच्या कडेला हिरव्या कापडाच्या आडोशाला आणि टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा घालून कारवाई केली.

त्या दारू अड्ड्यावर नुसती कारवाईच नाही तर थेट जेसीबीच्या सह्याने कच्चे बांधकामही पाडून टाकले. तर, पत्र्याच्या टपर्या मोडून टाकल्या. त्यामुळे बोल्हेगावच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण, उपनिरीक्षक विजय रणशिवरे यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...