Saturday, August 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAamir Khan: सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर अखेर आमिर खानने मौन सोडलं, म्हणाला...

Aamir Khan: सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर अखेर आमिर खानने मौन सोडलं, म्हणाला हा एक गैरसमज…

मुंबई | Mumbai
प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचूक हे दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने ते उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा २० वा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. देशातील अनेक सेलिब्रिटींनी आणि सर्वसामान्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी अनेक मान्यवरांनी जाऊन त्यांची भेट घेतली आहे तसेच त्यांच्या प्रकृती विषयी काळजी व्यक्त केली आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी ही अनेकांनी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. दरम्यान, ‘3 इडियट्स’ सिनेमातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओमी वैद्य यांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, त्यांना ‘रँचो’ (सोनम वांगचुक) यांना मृत्यूच्या दारात पाहायचं नाही. यानंतर आला अभिनेता आमिर खान याने अखेर मौन सोडले आहे. त्याने सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर भाष्य केले आहे.
नुकतेच त्याने ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. तिथे त्याला सोनम वांगचूक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

- Advertisement -

सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती…
‘3 इडियट्स’ (3 Idiots) या आमिर खानच्या सिनेमाची कथा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे का? या प्रश्नावर बोलताना आमिर खान म्हणाला की, “नाही, ते खरं नाही… उलट, हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच ‘चतुर’ (ओमी वैद्य) याचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यात त्याने तसे म्हटलेय… पण ते तसे नाही, त्याचा गैरसमज झालाय. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की, राजू (राजकुमार हिरानी), अभिजात जोशी (ज्यांनी ‘3 इडियट्स’चं लेखन केलंय) किंवा मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती…”

Sunil Tatkare: जयंत पाटलांनी फडणवीस-शिंदेंची भेट घेतली, अर्थखाते शरद पवार गटाकडे जाणार? सर्व चर्चांवर सुनील तटकरे म्हणाले…

ते उत्कृष्ट आणि खरोखरंच कौतुकास्पद आहे
पुढे बोलताना आमिर खानने सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत भाष्य केलेय. आमिर खान म्हणाला की, “तरीही, सोनम वांगचुक जे काम करत आहेत, ते उत्कृष्ट आणि खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केलंय की, सिनेमातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. मला फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती…”

“आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटतेय. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेनं संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील…”, असं सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करताना आमिर खान म्हणाला.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...