Monday, November 25, 2024
Homeमनोरंजन‘द काश्मीर फाईल्स’ला ‘व्हल्गर’ म्हणणाऱ्या ज्युरींना अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

‘द काश्मीर फाईल्स’ला ‘व्हल्गर’ म्हणणाऱ्या ज्युरींना अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

गोवा | Goa

गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) सोमवारी समारोप झाला. या मोहोत्सवाच्या क्लोजिंग सेरेमनीदरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रोपगंडा आणि व्हल्गर म्हणून संबोधण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

इस्रायली चित्रपट निर्माता नादेव लॅपिडच्या (Nadav Lapid) प्रपोगंडा वक्तव्यानंतर, आता सेलिब्रिटीजच्या रिअ‍ॅक्शन्स यायलाही सुरुवात झाली. यातच अभिनेते अनुपम खेर यांचीही प्रतिक्रीया समोर आली आहे.

अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा आणि वल्गर असल्याच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.’ अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ मधील त्यांचा फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे. खेर यांच्या या ट्विटला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

नदाव लॅपिड नक्की काय म्हणाले?

IFFI मध्ये बोलताना नदाव लॅपिड म्हणाले, “द कश्मीर फाईल्स चित्रपट बघून आम्हाला धक्का बसला आणि व्यथित आहोत. हा चित्रपट आम्हाला अश्लील आणि प्रचारकी वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवासाठी हा (द कश्मीर फाईल्स) चित्रपट योग्य नाही. मी माझ्या भावना तुमच्यासोबत खुलेपणाने बोलू शकतोय, कारण आपण सगळे इथे टीकेचाही स्वीकार करतो आणि चर्चा करतो.”

“या चित्रपट महोत्सवात डेब्यू कॉम्पिटिशन प्रकारात 7 चित्रपट बघितले आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन प्रकारात 15 चित्रपट बघितले. यापैकी 14 चित्रपट सिनेमॅटिक फीचर्सवर आधारित होते. द कश्मीर फाईल्स या 15 व्या चित्रपटाचा समावेश आम्हा सगळ्यांना त्रासदायक आणि आश्चर्यचकीत करणारा होता”, असं म्हणत त्यांनी द कश्मीर फाईल्सचा चित्रपट महोत्सवात समावेश केल्यावरून नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या