मुंबई | Mumbai
अभिनेत्री जिया खान (Jia Khan) मृत्यूप्रकरणी सर्वात मोठी बातमी आहे. जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) याचा मुलगा सुरज पांचोली (Suraj Pancholi) याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सूरजनं या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर सूरजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ‘सत्याचा नेहमी विजय होतो.’ या पोस्टमध्ये त्यानं ‘ हॅशटॅग गॉड इज ग्रेट’ असंही लिहिलं आहे. सूरजची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कारण 2013 साली जियानं गळफास घेत आत्महत्या केली होती तर त्याच्या तब्बल 10 वर्षांनी आता त्यावर निर्णय सुनावण्यात आला आहे.
जिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…
दरम्यान, जिया खान 3 जून रोजी 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूप्रकरणात सूरज पांचोलीचं नाव आलं होतं. जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. जियाच्या आईनेही सूरजवर आरोप करून त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. मात्र, सीबीआयने पुराव्या अभावी सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त केलं.
वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
सूरजनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. टाइम टू डान्स, हवा सिंह या चित्रपटामध्ये देखील सूरजनं काम केलं. गुजारिश, एक था टायगर यांसारख्या चित्रपटांचा सूरज हा असिस्टंट डायरेक्टर होता. तर, जियानं वयाच्या 18 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला.