Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCricket Retirement : वेस्टइंडिजचा धडाकेबाज खेळाडू निकोलस पूरनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Cricket Retirement : वेस्टइंडिजचा धडाकेबाज खेळाडू निकोलस पूरनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

मुंबई | Mumbai

वेस्टइंडिज (West Indies) क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनने (Nicholas Pooran) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या २९ व्या वर्षी पुरन याने निवृत्ती जाहीर केल्यामुळे जगभरातील असंख्य क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निकोलस आयपीएलमध्ये (IPL) लखनऊ संघाकडून खेळताना दिसला होता. निवृत्तीची घोषणा करताना निकोलसने त्याच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

निकोलसने पोस्टमध्ये म्हटले की,”मरून कलरची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीतासाठी उभं राहणं आणि प्रत्येक वेळी मैदानात (Ground) असताना सर्वतोपरी देत राहणं. माझ्यासाठी या गोष्टींचा अर्थ काय हे शब्दांत सांगणं खूप कठीण आहे. संघाचा कर्णधार होणं ही सन्मानाची मोठी बाब आहे जी नेहमीच माझ्या स्मरणात राहील”, असे त्याने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nicholas Pooran (@nicholaspooran)

दरम्यान, निकोलसने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत (International Format) एकूण ६१ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले असून, १९८३ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १०६ टी २० सामन्यात २२७५ धावा केल्या आहेत. सन २०१९ मधील वर्ल्डकप स्पर्धेत निकोलसने वेस्टइंडिज संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...