Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनबॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल लवकरच; उद्या अंतिम सुनावणी

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल लवकरच; उद्या अंतिम सुनावणी

मुंबई | Mumbai

‘निशब्द’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणारी, ‘गजनी’ फेम अभिनेत्री जिया खानच्या दहा वर्षांपूर्वी केलेल्या आत्महत्याने सगळीकडेच खळबळ उडाली होती. जिया खानने 3 जून 2013 मध्ये मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

- Advertisement -

याप्रकरणी जियाच्या आईने तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सूरज पांचोलीवर (Actor Sooraj Pancholi) आरोप केले होते. या प्रकरणाला आता तब्बल दहा वर्षे उलटली आहेत. आता या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

Accident : विचित्र अपघात, अनेक वाहने एकमेकांवर आदळली; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

जिया खानने आत्महत्या केल्यानंतर तिच्या घरातून सहा पानांची सुसाईड (Suicide) नोट सापडली होती. त्या नोट नुसार जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात २० एप्रिलला सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सैय्यद यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून अंतिम युक्तिवाद शेवटच्या सुनावणीला राखून ठेवला आहे. त्यानुसार २८ एप्रिलला म्हणजेच उद्या सकाळी १०:३० वाजता सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सुरज पांचोलीला १० जून २०१३ ला अटक करण्यात आली होती. सुरज पांचोली २ आठवड्यांहुन अधिक दिवस पोलीस कोठडीत होता.

Barsu Refinery : दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यानंतरच…; उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर जुलै २०१४मध्ये हे प्रकरण ५ वर्षांसाठी सीबीआयकडे होते. जियाच्या आईने देखील सांगितले की, ही हत्या नसून आत्महत्या आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करणारी याचिका फेटाळून लावली होती.

उसने पैसे परत मागितल्याने, तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

जिया खानच्या आईने सीबीआय कोर्टात ( CBI Court) निवेदन दिले होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की सूरज जियावर शारिरीक आणि शाब्दिक अत्याचार करत होता. पोलीस आणि सीबीआय या दोघांनीही हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला आता १० वर्षे पूर्ण होत असताना उद्या, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता विशेष सीबीआय न्यायालय १० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देणार आहे. या महत्वाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या