मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक काजोल आजही सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. दरम्यान, ती सध्या एका विधानामुळे चांगलीच चर्चेत आहे. काजोलने आपल्या देशातील राजकीय नेत्यांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. आपल्या देशातील नेते अशिक्षित असल्याचं काजोलनं म्हटलं आहे. ती आपल्या ‘द ट्रायल’ या वेबसीजच्या निमित्ताने एका कार्यक्रमात बोलत होते.
काजोल म्हणाली की, भारतातील बदल हे फार मंद गतीने होत आहेत, कारण आपण आपल्या परंपरा, विचार यात अडकलो आहोत आणि याचा अर्थातच संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन हे पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. पण यातील अनेक नेते असे आहेत, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही आणि तो फक्त शिक्षणामुळे येतो.
काजोलच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिच्या या वक्तव्याबद्दल समर्थन केले आहे. यानंतर आता काजोलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. “मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता. आपल्याकडे काही महान नेते आहेत, जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत”, असे ट्वीट काजोलने केले आहे.
काही दिवसांपूर्वी काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. तिचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज झाला. काजोलसोबतच या चित्रपटात तमन्ना भाटिया , विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या देखील प्रमुख भूमिका साकारली. आता काजोलच्या द ट्रायल या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘करण-अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,‘गुप्त’, ‘हलचल’ या काजोलच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.