मुंबई | Mumbai
२०२० साली जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचीही आज बातमी समोर आली आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा करोना लाटेचा धोका निर्माण झालाय. भारतातही करोनाने पुन्हा शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत करोनाचे ८ रुग्ण आढळले आहे. त्यातच आता बॉलिवुडच्या प्रसिध्द अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. ९० च्या दशकात आघाडीवर असलेली आणि नुकतीच बिग बॉस १८ मुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचे निदान झाले आहे.
https://www.instagram.com/p/DJ1A-HxNOVp/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे, “हॅलो मित्रांनो, माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुरक्षित राहा आणि मास्क घाला.” हेल्थ अपडेट दिल्यानंतर शिल्पा यांचे चाहते चिंतेत आहेत. हिंदी बिग बॉस १८ मध्ये शिल्पा शिरोडकर झळकल्या होत्या. त्या टॉप स्पर्धकांपैकी एक होत्या. बिग बॉस १८ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धेकांपैकी एक होत्या.
शिल्पाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कोरोना पुन्हा आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. सर्वांना पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा