Friday, January 23, 2026
HomeमनोरंजनGovinda Health Update : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध; रुग्णालयात दाखल, नेमकं...

Govinda Health Update : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध; रुग्णालयात दाखल, नेमकं घडलं काय ?

मुंबई । Mumbai

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारांसाठी जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तरीही चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास गोविंदा अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने औषधोपचार देण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

YouTube video player

गोविंदाचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. “गोविंदाची तब्येत सध्या स्थिर आहे,” असे बिंदल यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांनी गोविंदाच्या अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या असून, या चाचण्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी उपचार सुरू होते, परंतु तब्येत अधिक खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. गोविंदाला ललित बिंदल यांनीच रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील डॉ. नामजोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तो त्याच्या खोलीत विश्रांती घेत आहे. चाचण्यांचे निकाल आलेले नाहीत, पण काळजी करण्यासारखे काही नाही.”

विशेष म्हणजे, गोविंदा रुग्णालयात दाखल होण्याआधी दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी स्वतः गाडी चालवत ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता. या भेटीनंतरच गोविंदाच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जवळपास वर्षभरापूर्वीही गोविंदाला याच क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी चुकून हातातून मिसफायर झालेल्या गोळीमुळे त्याच्या गुडघ्याला जखम झाली होती. शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातील गोळी काढण्यात आली होती. त्यानंतर तो बरा झाला आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतानाचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत राहिला आहे. पत्नी सुनीता अहुजा यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याची चर्चा होती. मात्र, नंतर चर्चांवर पडदा पडला आणि त्यांच्या वकिलांनी सुनीता यांनी माघार घेतल्याची माहिती दिली होती. विविध मुलाखतींमध्ये सुनीता यांनी गोविंदासोबतच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दलही मोकळेपणाने भाष्य केले होते.

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...