Sunday, May 19, 2024
Homeधुळेबॉम्ब शोध पथकातील श्वान लुसीचा मृत्यू

बॉम्ब शोध पथकातील श्वान लुसीचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

धुळे पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान लुसीचा मृत्यू झाला असून तिच्यावर शासकीय इतमात आर्वी फायर बट परिसरात दफनविधी करण्यात आला.

- Advertisement -

धुळे बॉम्ब शोधक व नाशक पथकात श्वान लुसी 27 डिसेंबर 2011 पासून कार्यरत होती. तिचे नऊ वर्ष सहा महिने वय झाल्याने ती आजारी पडली. तिच्यावर औषधोपचार सुरु होते. दि. 2 जून रोजी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण वाकडे यांनी लुसीला मयत घोषीत केले.

आज दि. 3 जून रोजी लुसीवर शासकीय इतमात पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सलामी देवून तिच्यावर आर्वी फायर बट परिसरात दफन विधी करण्यात आली.

श्वान लुसी ही लॅबरोडॉर जातीची होती. तिचे प्रशिक्षण पुणे सीआयडी येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात झाले होते. त्यानंतर धुळे येथे पोलीस दलात लुसी दाखल झाली. सन 2017 व 18 मध्ये नाशिक येथील पोलीस कर्तव्य मेळावा यात स्फोटक शोधण्यात नाशिक परिक्षेत्रात तिने प्रथम क्रमांक पटकावला होता.

तसेच सन 2018 मध्ये पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळाव्यात सहभाग घेतला होता. कुंभ मेळावा नाशिक येथे तिने उत्तम कामगिरी बजावली होती. सेलवासा केंद्र शासीत प्रदेश, नागपूर अधिवेशन व सणउत्सव, व्हीआयपी दौरा यावेळीही लुसीने उत्तर कर्तव्य बजावले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या