Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजChhota Rajan Bail : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा;...

Chhota Rajan Bail : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; या प्रकरणात जामीन मंजूर

मुंबई | Mumbai
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात हायकोर्टाने छोटा राजनला जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या शिक्षेला छोटा राजनने आव्हान दिले. यावर निकाल लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील असे हायकोर्टाने म्हटले. मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार.

२००१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचे मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने ३० मे रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजनला याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २००१ मध्ये झालेल्या हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात छोटा राजनला जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेले आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र इतर अनेक प्रकरणामुळे छोटा राजनचा कारागृहातच मुक्काम असणार आहे.

न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमुर्ती पृथ्वीराज चह्वाण यांच्या खंडपीठाने राजन यांची एक लाख रुपयाच्या मुचलक्यावर सुटका केली. याचवर्षी मे महिन्यात विशेष न्यायालयाने छोटा राजनला हॉटेल व्यवसायिकाच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. छोटा राजनने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याने शिक्षा स्थगित करण्याची आणि अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण?
मध्य मुंबईत गावदेवीमध्ये ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक जया शेट्टी यांची 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हत्या करण्यात आली होती. राजन गँगच्या सदस्यावर गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप होता. चौकशीमध्ये जया शेट्टी यांना छोटा राजन गँगच्या हेमंत पुजारीकडून वसुलीसाठी फोन आला होता. खंडणीची रक्कम न दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

देशदूतच्या व्हाट्सप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या