दिल्ली | Delhi
ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत.
रियाला 8 सप्टेंबरला दुपारी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.
मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला आहे.