वृक्षांचे महत्त्व आपण पुस्तकातून शिकतोच. पर्यावरणातील त्यांचे अढळ स्थान आपण नाकारू शकत नाही. झाडं म्हणजे एखादा कारखाना म्हणता येईल, जो माणसाला उपयोगी अशी सर्व उत्पादने देते. धान्याव्यतिरिक्त झाड तुम्हाला कपडे, कागद, डिंक याशिवाय औषधांसाठी कच्चा माल पुरवत असते. उदाहरण पहायचं झालं तर कोरफडीच्या झुडुपाचे घेऊ. कोरफडीचा उपयोग तेल आणि क्रीम तयार करण्यासाठी देखील होतो. पण कोणत्या झाडाचा नेमका कशासाठी उपयोग करायाचा हे कसे कळते. ते कळते, वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाने. पृथ्वीवर आढळणार्या सर्व झाडांचा यात अभ्यास केला जातो.
जीवशास्त्रामध्ये दोन शाखा आहेत, एक प्राणी शास्त्र आणि वनस्पतिशास्त्र.कोणत्याही सजीवांना जगण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. उदरनिर्वाह, प्रजनन या सर्व गोष्टी उर्जेवर अवलंबून असतात आणि त्यासाठी सर्वच जीव सूर्यावर म्हणजेच सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात. सूर्यापासून निघणारी उर्जा प्रकाशाच्या स्वरुपात पृथ्वीवर पोचते. पण ही उर्जा ग्रहण करण्याची क्षमता फक्त झाडांमध्ये असते. त्याव्यतिरिक्त सर्वच प्राणी अगदी मनुष्य सुद्धा ही उर्जा झाडांकडूनच मिळवतो. त्यामुळे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासशाखेचे वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे.
पात्रता : शास्त्र शाखेच्या अभ्यासासाठी गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिक शास्त्रासह बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र ठरतात. या शाखेतले विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. बीएससी, एमएससी, एमफील नंतर वनस्पतीशास्त्र शाखेत डॉक्टरेटही तुम्ही मिळवू शकता.
वेतनश्रेणी : या विज्ञानशाखेमध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही स्तरावर रोजगार संधी मिळू शकते. अध्यापन आणि संशोधन या दोन्ही पातळीवर सरकारी नोकरी मिुळू शकते. त्यासाठी उत्तम पगार मिुळू शकतो. सध्या या दोन्ही पातळ्यांना तीस हजार रूपयांपासून पगार मिळू शकतो. त्याशिवाय खाजगी क्षेत्रातही नोकर्यांचे प्रमाण वाढताना दिसते. पर्यावरण दृष्टीकोनातूनही याकडे पाहिले जात असल्याने मोठमोठ्या खाजगी कंपन्या यातील तज्ज्ञ लोकांना नेमतात.
सुरुवात आणि विकास : वनस्पती शास्त्रात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वच वनस्पतींचा अभ्यास केला जातो. शेवाळ या वनस्पतीपासून या शाखेच्या अभ्यासाला सुरुवात होते. शैवाल ही वनस्पती सर्वात जुनी आहे. उत्क्रांतीच्या काळापासून अस्तित्वात आहे. ही वनस्पती आपले जेवण स्वतःच बनवते. आज कित्येक आकारात, प्रकारात शैवाल म्हणजे शेवाळं ही वनस्पती आढळते. या वनस्पतीपासूनच पुढे इतर वनस्पती तयार झाल्या असे शास्त्रज्ञांचे मत आहे. वनस्पती शास्त्राच्या अभ्यासात पहिल्यांदा वनस्पतीला नाव दिले जाते, व वर्गीकरण केले जाते. त्याशिवाय वनस्पतींचा अभ्यासाचा काहीच फ़ायदा होत नाही. त्यामुळेच वर्गीकरण शास्त्र हा या शाखेचा महत्त्वाचा आणि सर्वात जुना विभाग आहे. या शाखेत वनस्पतींचे नुसतेच नामकरण केले जात नाही, तर वनस्पतींचा परस्परसंबंधांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरणही केले जाते.
कुठे मिळेल संधी? : वनस्पती शास्त्रात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यासाठी अनेक प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध आहेत. प्राध्यापक, पार्क रेंजर, ब्रीडर, नर्सरी प्रबंधक, कृषीसल्लागार, उद्यान शास्त्रज्ञ यांसारख्या नोकर्या त्याला मिुळू शकतात.
दीर्घकालीन व्यवसाय : सखोल अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही वनस्पतीशास्त्रज्ञ होऊ शकता. त्यालाच शैक्षणिक पात्रतेची जोड असल्यास तुम्ही वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण करु शकता. पण त्याशिवायही तुम्ही पर्यावरणविषयक तांत्रिक सल्लागार, प्रयोगशाळेत सल्लागार या स्वरुपाची कामे करु शकता. अनेक लोक पर्यावरण आणि उद्यान विकास क्षेत्रात काम करतात. तर काही लोक संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहू शकता.
पदवीधारकांसाठी रोजगार संधी : खाजगी क्षेत्रातही मोठी संधी या शाखेत मिुळू शकेल. औषध कंपन्या, नर्सरी, जैवउद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, तेल उत्पादक, रसायने, बियाणे तयार करणार्या कंपन्या, कागद कंपन्या शिवाय शेती संशोधन केंद्र, केंद्रिय वन आणि शेती विभाग इ. ठिकाणी रोजगाराची संधी मिळू शकते