Friday, May 3, 2024
Homeजळगावअपहरण झालेली दोन्ही चिमुकले अमळनेरात सापडली

अपहरण झालेली दोन्ही चिमुकले अमळनेरात सापडली

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव शहरातील गोपाळ पूरा येथे रोजगाराच्या निमित्ताने राहत असलेल्या मध्यप्रदेशातील परप्रांतीय कुटुंबांतील दहा वर्षाची मुलगी शुभांगी राजू चव्हाण व नऊ वर्षांचा मुलगा मयूर रवींद्र बुनकर या दोन जणांचे तरुणाने अपहरण केल्याची घटना २७ मे रोजी समोर आली होती.

- Advertisement -

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही मुलांचे अपहरण करणार्‍या सुनील पडत्या बारेला रा. चिरमलीया जि.बडवानी, मध्यप्रदेश याच्या विरोधात २९ मे रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान ही दोन्ही बालके आज मंगळवारी सुरेश पापाची दाभोळे रा. अमळनेर यांच्या सतर्कतेमुळे अमळनेरात सुखरुप सापडली अाहे. दाभोळे यांनी मुलांसह संशयितांला अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दोन्ही बालकांना ताब्यात घेत रात्री १० वाजता शनिपेठ पोलिसांचे पथक जळगावात पोहचले.

पिडीत बालकांचे कुटुंबिय हे मूळ मध्यप्रदेशातील असून रोजगार निमित्ताने शहरातील गोपाळपूरा येथे वास्तव्यास आहेत. या कुटुंबाच्या ओळखीतील सुनील पडत्या बारेला हा तरुण २७ मे रोजी जळगावात आला.

यादरम्यान सुनील बारेला हा गोपाळपूरा येथे बालकांच्या घरी आला. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने दहा वर्षाची शुभांगी चव्हाण व ९ नऊ वर्षाचा मुलगा मयुर बुनकर यास खाऊ घेवून देण्याचे आमिष दिले. खाऊ घेण्यासाठी दोघांना सोबत घेवून सुनील बारेला घराबाहेर पडला. यानंतर सुनील हा परतला.

तसेच त्याच्यासोबत घेवून गेलेली दोन्ही बालकेही आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर दोन्ही मुले मिळून न आल्याने आज शनिवारी मुलीच्या आईने शनिवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात मुलांना पळवून नेणार्‍या सुनील पडत्या बारेला याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

दोन्ही बालकांचे एकाचवेळी अपहरण झाल्याच्या प्रकाराची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. त्याच्या सुचनेनुसार शनिपेठ पोलिसांचे पोलीस उपनिरिक्षक अमोल कवडे, गणेश गव्हाळे, विजय निकम, अनिल कांबळे, भावेश कोठावदे पथक रवाना केले होते. गेल्या पाच दिवसांपासून मध्यप्रदेशातील बडवानी, चिरमलीया, शिंदवाड यासह चोपडा तालुक्यातील वैजापूर, जुनापाणी, बडवानी यासह डोंगराळ भागात संशयितासह चिमुकल्यांचा शोध घेतला. आज मंगळवारी संशयित सुनील बारेला यास दोन्ही मुलांसह नागरिकांनी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची मिळाल्याने पथकाने अमळनेर गाठून संशयित सुनील व दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. दोन्ही मुलेही सुखरुप असल्याची माहिती मिळाली असून रात्री १० वाजता मुले व संशयितांना सोबत घेत पथक जळगावात पोहचले.

संशयित सुनील बारेला हा दोन्ही मुलांना सोबत घेवून अमळनेरात पोहचला. याठिकाणी तो कामाच्या शोधात सुरेश पापाजी दाभोळे यांना भेटला. दाभोळे यांनी आपल्या तबेल्यावर सुनीलला २०० रुपये रोजंदारीवर कामाला ठेवले.

संबंधित ठिकाणी काम करत असतांना संशयित सुनीलला दाभोळे बाहेरगावी घेवुन जात असतांना मुलगी शुभांगी रडायला लागली. तिला विचारले असता तिने सुनील हा आमचा वडील नसल्याचे सांगून त्याने आम्हाला दोघांना पळून अाणल्याची आपबिती कथन केली.

दाभोळे यांनी तत्काळ गंभीर प्रकारची अमळनेर पोलिसांना माहिती देत मुलांसह संशयित सुनील बारेला यास अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या