Wednesday, July 24, 2024
HomeUncategorizedकचरा जळताना बाटलीचा स्फोट

कचरा जळताना बाटलीचा स्फोट

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

शहरातील गारखेडा परिसरात एका अपार्टमेंटजवळ पडलेला कचरा जळत  (Burning garbage) असताना अचानक त्यातील एका काचेच्या बाटलीचा स्फोट (Glass bottle explosion) झाल्याने अकरा वर्षीय मुलगा जखमी (Boy injured) झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एक आठवड्यानंतर कचरा जळणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

गारखेडा परिसरातील मयूर टेरेसेस अपार्टमेंटमध्ये ६ मार्च रोजी दुपारी वंदना गणेश मुळे या महिलेने अपार्टमेंटजवळ पडलेला कचरा एकत्र करून पेटवून दिला. त्याचवेळी त्या अपार्टमेंटमधे राहणारा अर्णव अभय देशमुख हा तिथे खेळत होता. जळत असलेल्या कचर्‍यात पडलेल्या बाटलीचा स्फोट झाला व अर्णवच्या गळ्याला, मानेला गंभीररित्या भाजले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू झालेत. यानंतर या महिलेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या