Friday, May 3, 2024
Homeक्रीडाTokyo Olympics: भारतीय बॉक्सर लवलीना पदकापासून एक विजय दूर

Tokyo Olympics: भारतीय बॉक्सर लवलीना पदकापासून एक विजय दूर

टोकियो

मीराबाई चानूने (Chanu Saikhom Mirabai) टोकियो ऑलिम्पिक (Olympics) 2020 मध्ये भारतासाठी (India) पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय हॉकी संघाने जोरदार पुनरागमन केले. आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात हॉकी संघाने स्पेनवर 3-0 ने विजय मिळवून केल्याने भारताच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

- Advertisement -

कसारा घाटातील तो व्हिडिओ खोटा, काय आहे सत्य?

भारतीय बॉक्सर लवलीना (Lovlina) क्‍वार्टर फायनलमध्ये पोहचली आहे. आता पदकापासून ती फक्त एक विजय लांब आहे. 23 वर्षीय लवलीनाने (Lovlina) जर्मनीच्या नादिने एपेट्जला Nadine Apetz पराभूत केले. लवलिनाची क्वार्टर फायनल 30 जुलै रोजी चीनच्या ताइपे की चिन निएन चेनशी होणार आहे.

बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग-सात्विक जोडीने साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकला. पण त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

10 मीटर एअर पिस्टल सांघिक मिश्र प्रकारात मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांच्यासह यांच्यासह अभिषेक वर्मा आणि यशस्वी सिंग देसवाल यांचे आव्हान संपुष्टात आले. पात्रता फेरीतील पहिल्या स्टेजमध्ये अव्वलस्थान पटकावत मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार सुरुवात केली. अभिषेक वर्मा आणि यशस्विनी जोडी 17 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनू आणि सौरभ या जोडीला पहिल्या स्टेजमध्ये टॉपला राहिल्याचा फायदा मिळेल असे वाटत होते. पण फायनल राउंडमध्ये ही जोडी सातव्या क्रमांकावर राहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या