Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedजम्बो लसीकरण मोहिम सुरू होताच लागला 'ब्रेक'!

जम्बो लसीकरण मोहिम सुरू होताच लागला ‘ब्रेक’!

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद शहरात कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली खरी, मात्र आता लसींच्या पुरवठ्याअभावी या मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे तरी कसे?  

महानगरपालिकेने लसींचा साठा मिळवण्यासाठी आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. अद्याप राज्याच्या आरोग्य विभागाकडून लस मिळण्यासंदर्भात पालिकेला कोणताही रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम किमान दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनाबाधित होत आहेत.

त्यामुळे वाढत्या संसर्गाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी पालिकेने शहरात जम्बो कोरोना लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. 5 एप्रिलपासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेने 115 वॉर्डात प्रत्येकी एक याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू केले. लसीकरणासाठी मोठया प्रमाणावर लसीचा साठा उपलब्ध करुन घेतला.

त्यामुळे सुरूवातीला दररोज 4 ते 5 हजार नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवला. टास्क फोर्स पथकाच्या प्रमुख अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, बॅक कर्मचारी, कंपन्यांचे कामगार यांचे लसीकरणही हाती घेण्यात आले. परिणामी, लसीकरणाला आणखीनच गती मिळाली.

मागील आठवडाभरापासून 5 ते 7 हजार दरम्यान नागरिकांचे लसीकरण होऊ लागले. त्यामुळे पालिकेने दर आठवडयासाठी किमान एक लाख लसींचा पुरवठा मिळावा, अशी मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे.

दीड लाख लसीचा साठा मिळावा, अशी मागणी पालिकेने आता आरोग्य विभागाकडे केली आहे. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले की, लस कधी मिळणार हे आरोग्य विभागाकडून अद्याप कळालेले नाही. त्यामुळे लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दोघे जेरबंद 

- Advertisment -

ताज्या बातम्या