धुळे – प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेल्या दोन करोना बाधितांचा आज सकाळी मृत्यू झाला.
- Advertisement -
त्यात शिरपूरातील ५८ वर्षीय पुरुष व वसमाणे (ता शिंदखेडा) येथील २७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या ३१ झाली आहे.
धुळे शहरातील १४ तर धुळे ग्रामीणमधील १६ जणांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी व रात्री एकूण 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात धुळे शहरातील 14, धुळे तालुका 1 (तरवाडे), साक्री शहर व तालुका 7, शिंदखेडा तालुका 2 त्यात शिंदखेडा (1), मालपूर- दोंडाईचा (1) व शिरपूरातील 3 जणांचा समावेश आहे.
जिल्हातील एकूण रूग्ण संख्या 354 झाली आहे. तर एकूण 166 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.