Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Railway Accident : मुंबईमध्ये विचित्र अपघात; धावत्या लोकलमधून ट्रॅकवर पडल्याने पाच...

Mumbai Railway Accident : मुंबईमध्ये विचित्र अपघात; धावत्या लोकलमधून ट्रॅकवर पडल्याने पाच जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

मध्य रेल्वेमार्गावर (Mumbai Train Accident) आज (९ जून) सकाळी एक मोठा अपघात झाला आहे.पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून पाच प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

रेल्वेत प्रवाशांची संख्या अधिक असल्याने प्रवासी दाराजवळ उभे राहून प्रवास करत होते. सकाळच्या वेळी शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या जास्त होती. दरवाज्यावर लटकलेल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. यात ६ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने काय म्हटलंय?

पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. याबाबतची माहिती कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही. कसाऱ्याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्स्पेस बाजूनेच जात होत्या. त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले, हे समजू शकलेले नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची...

0
ओझे l वार्ताहर | Oze नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी...