Wednesday, April 2, 2025
Homeधुळेधुळे : वरिष्ठ टपाल अधिकाऱ्याचा करोनाने औरंगाबाद मध्ये मृत्यू

धुळे : वरिष्ठ टपाल अधिकाऱ्याचा करोनाने औरंगाबाद मध्ये मृत्यू

एका सहाय्यक अधिकाऱ्यावर जळगावात तर दोघांवर धुळ्यात उपचार सुरू

धुळे

- Advertisement -

येथील टपाल कार्यालयातील वर्ग- १ पदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा औरंगाबाद मध्ये मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याच कार्यालयातील एका सहाय्यक अधिकाऱ्यावर जळगावात उपचार सुरू आहेत तर दुसरा अधिकारी धुळ्यात दाखल आहे.

सोबत अधिकाऱ्याचे खाजगी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे समजते. सर्दी, खोकला झाल्याने सहाय्यक अधिकारी आपल्या गावी जळगाव येथे गेल्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

तसा रिपोर्ट जळगाव प्रशासनाने धुळ्यात कळविला आणि मग धावपळ सुरू झाली. विशेष म्हणजे त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आपल्या गावी औरंगाबादला गेले. तेही करोना बाधित असल्याचा रिपोर्ट आला आणि आता त्यांचा मृत्यू झाला आहे.

मनपाने धुळ्यातील संपूर्ण टपाल कार्यालय फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. तर वरिष्ठांच्या सुचनेनुसार 25 मे पर्यंत टपाल कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

0
सप्तशृंगगड | नांदुरी | वार्ताहर | Nanduri आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने...