शिरसोली येथील गरजु कुटूंबांना किराणा साहित्याचे वाटप
जळगाव –
सध्या देशासह कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसाचे लोकडाऊन केल्याने सर्वानाच घरी थांबावे लागत आहे. अशातच आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणी यांची आठवण येणे स्वाभाविक आहे . त्यामुळे काहींनी जिल्ह्यासह राज्यात पर राज्यात आणि देश विदेशात स्थायिक झालेल्या आपल्या जवळीक असलेल्या मित्रांशी संवाद साधून एक महिन्या आधी व्हॉट्सप ग्रुपची स्थापना करून सर्वानी मिळून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोरगरीब गरजू व्यक्तींना किराणा साहित्याचे किट देण्याचे ठरविले.
या साहित्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, मीठ साखर, चहा, मसाला, तिखट मिरची, हळद, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा यात समावेश आहे. शहरातील १९९९ च्या न्यू इंग्लिश मेडिएम स्कूलच्या १० विच्या बँचमधील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन एका शिरसोली येथे गरजूंना कीराणा साहित्यांचे ५० किट वाटप करण्यात आले.
सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींचा रोजगार बुडून त्यांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शिरसोली येथिल अनेकांचा रोजगार बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषन्गाने सामाजिक बांधिलकी म्हणून जळगाव शहरातील 1999 च्या न्यू इंग्लिश मेडिएम स्कूलच्या दहावीच्या बँच मार्फत कीट वाटप करण्यात आले.
खरेतर कोरोनामुळे व्हाट्सअप ग्रुपद्वारे एकत्र आल्याने समाजाकरिता आपले काहीतरी देणे लागतो या निरपेक्ष भावनेतून किराणा साहित्याचे वाटप करताना गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद हा आत्मिक समाधान देणारा असल्याची भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
हे माजी विद्यार्थी आले एकत्र
यावेळी आनंद पांडे, बलराम लोकवाणी, हितेश ललवाणी, अभिषेक कोरीया, अमित वर्मा, भरत भेंडवाल, भरत धारा, भरत शर्मा, चंदु सैनी, दर्शन जानी, दिपेश राजकोठीया, डॉ.मनिष सरोदे, डॉ विकास जोशी, गणेश वैद्य, गौतम लापसिया, डॉ.गोपाल चव्हाण, काफिल खान, महावीर मल्हारा, डॉ.सिमा राणे, डॉ.रसिका देशपांडे, निता ललवाणी, रुबी सुरतवाला, रश्मी मित्तल, इंदू सैनी, शितल आवस्थि, रिना वंसत, प्राची बाहलके, हर्षप्रिया त्रिपुरे, सिध्दांत महाजन, कुणाल शहा, आरती शहा, सिमा मणियार यांच्यासह 54 मित्रांनी गरजूं लोकांना दिले.
यावेळी शिरसोली गावातील पत्रकार भगवान सोनार, शेनफडू पाटील, राजु चौधरी, आबा सोनार, चंदु काळे, बापू मराठे, अकील मेंबर, नाना हवलदार, संजू सोनार, बबलू सोनार, भगवान पाटील हे उपस्थित होते.