Saturday, May 18, 2024
Homeजळगावजळगाव : रावेर तालुक्यातील 27 गावांना वादळाचा तडाखा ; 18 कोटींचे नुकसान

जळगाव : रावेर तालुक्यातील 27 गावांना वादळाचा तडाखा ; 18 कोटींचे नुकसान

रावेर | प्रतिनिधी

देशात करोनामुळे केळी भाव घसरून शेतकरी संकटात सापडलेले असतांना, बुधवारी लहरी निसर्गाच्या तडाख्याने २७ गावांमध्ये केळी बागांचे प्रचंड नुकसान झाल्याने ८७७ शेतकऱ्यांचे १८ कोटी ३ लाख ४० हजार रुपयांची केळी व २३ घरांची पडझड झाल्याने तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे.

- Advertisement -

बुधवारी झालेल्या वादळाने विवरा, निंभोरा, वडगांव यासह सुमारे २७ गावातील केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. गुरुवारी आमदार शिरीष चौधरी यांनी नुकसान झालेल्या भागात फिरून शेतकऱ्यांचे सांत्वन करत मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले आहे.

यावेळी प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले,तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या.महसूल व कृषी विभागाने या २७ गावातील ८७७ शेतकऱ्यांचे सुमारे ४५० हेक्टरवरील केळीचे १८ कोटी ३ लाख ४० हजार रुपये नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.शेती नुकसानीनंतर वादळाने अनेक मातीची घरे देखील तडाख्याने मोडून पडल्याने २३ घरांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोरोनामुळे आधीच केळीचे भाव निम्यावर आल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले असूनही मानवनिर्मित संकटानंतर नैसर्गिक वादळाने देखील शेतकऱ्यांचे नुकसान केल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादक प्रचंड संकटात सापडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या