Sunday, April 27, 2025
Homeजळगावनंदुरबार जिल्ह्यात तीन रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; कुटूंबातील सदस्यांना केले क्वॉरंटाईन

नंदुरबार जिल्ह्यात तीन रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; कुटूंबातील सदस्यांना केले क्वॉरंटाईन

नंदुरबार – प्रतिनिधी

जिल्ह्यात पुन्हा आणखीन तीन रुग्णाचा अहवाल कोरोना पोझिटीव्ह आला असून जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता ७ झाली आहे.

- Advertisement -

आज शहादा शहरातील दोन तर अक्कलकुवा मधील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या तीन रूग्णांमध्ये दोन महिला तर पुरूष

शहादा मधील 31 वर्षीय युवक आणि 45 वर्षीय महिला तर अक्कलकुवा मधील 32 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आदर्श पद्धतीनुसार (एसओपी) कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कुटूंबातील रूग्णांना केले क्वॉरंटाईन
अक्कलकुवा येथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चार सदस्यांना क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेण्यासाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. शहादा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या १२ नातेवाईकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी एकात लक्षणे आढळल्याने त्यास नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी फवारणी करण्यात आली असून बॅरेकेडिंग करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : नगरमध्ये बनावट बासमती तांदळाचा भंडाफोड; 62 लाखांचा साठा...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) येथील एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने भंडाफोड केला. सुमारे 62...