चंद्रकांत पाटील
चोपडा जि.जळगाव –
काळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय चोपडा येथील एका विद्यार्थ्याला आला. शहरातील हेमलता नगर मधील रहिवाशी व पंकज महाविद्यालयातील इयत्ता १२ वी सायन्सचा विद्यार्थी दिपक बोरसे याचा आज दि.२ मार्च रोजी बॉयलॉजी विषयाचा पेपर होता.
अशात त्याचे वडील वरला (मध्यप्रदेश) येथे शासकीय माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले सुरेश शांतीलाल बोरसे यांचे दि.२ मार्च रोजी सकाळीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
वडील गेल्याची वार्ता सकाळीच चोपड्यात पोहचली परंतु डोंगरा एव्हढे दुःख असतांना काळजावर दगड ठेवत दिपकने मोठ्या धैर्याने आज सोमवारी सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान बारावीचा पेपर दिला.
जन्मदात्या पित्याचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर त्यांचे प्रेत घरात असतांना
बारावीचा पेपर देण्यासाठी दिपक बोरसेने दाखलेल्या धैर्याला अनेकांनी दाद दिली आहे.