Friday, March 28, 2025
Homeधुळेधुळे : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने चौफेर नाकाबंदी ; साक्री शहर केले...

धुळे : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने चौफेर नाकाबंदी ; साक्री शहर केले सील

धुळे

धुळे शहरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने अधिक सक्त पावले उचलली आहेत. धुळ्यात आज कडकडीत बंद असून चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर साक्रीतील एकाचा मृत्यू झाल्याने  संपूर्ण साक्री शहर सील करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री 12 वाजेपासून दीड दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.

यात भाजीपाला, दूध, यांनाही बंदी करण्यात आली असून फक्त आरोग्य यंत्रणा, मेडिकल, आणि प्रसार माध्यमांना वागण्यात आले आहे. आज खऱ्या अर्थाने शहरात संचारबंदी जाणवते आहे.

दरम्यान, येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यातील कोरोना अतिदक्षता विभागात ऍडमिट असलेल्या दोघांचा एकाच दिवसात कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यात आधी साक्रीतील एका 53 वर्षीय वृद्धाचा समावेश असून आज पहाटे 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...