Wednesday, March 26, 2025
Homeजळगावजळगाव : कोंबडी बाजाराजवळ तरूणाचा खून ; शहराची शांतता सुव्यवस्था धोक्यात

जळगाव : कोंबडी बाजाराजवळ तरूणाचा खून ; शहराची शांतता सुव्यवस्था धोक्यात

जळगाव –

जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खून, मारामाऱ्या, चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून पुन्हा तरूणाचा खून झाल्याच्या घटनेने शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. कोंबडी बाजाराजवळ रात्री एका तरूणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ही घटना रात्रीच्या वेळेस झाली असून ती पहाटे निदर्शनास आली. कोंबडी बाजाराजवळील एका दुकानाजवळ या तरूणाची इतरांशी वाद झाल्याचे व झटापटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस तपासानंतर खून झालेल्या तरूणाचे नाव प्रशांत जंगाळे असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही याठिकाणी पाचारण करण्यात आले. या तरूणावर झालेल्या हल्ल्याचे कारण मात्र समजू शकलेले नसून पोलीस तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...