Friday, May 31, 2024
Homeजळगावजामनेर : होळ हवेली येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जामनेर : होळ हवेली येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जामनेर (प्रतिनिधी) –

जामनेर तालुक्यातील होळहवेली येथील तरुण शेतकरी सचिन भगवान चव्हाण (वय 20) हा आज दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा.सुमारास शेतामध्ये कपाशी व गहू पिकाला पाणी भरणा करण्यासाठी गेला असता इलेक्ट्रिक पंप सुरू करीत असताना पेटी मध्ये करंट असल्याने त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जामनेर  उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या