सध्या ऑफिस मध्ये एकच चर्चा चाललीये आणि ती म्हणजे “2019 ची मिस युनिव्हर्स ” झुझीबीनी तुंझी” आणि मिस वर्ल्ड “टोनी -ऍनसिंग या दोन्ही आफ्रिकन मुलींनी जिंकल्याची.
म्हणजेच एखादी कृष्णवर्णीय व्यक्ती सुद्धा सुंदर असू शकते हे या स्पर्धेमधून समोर आले. कारण “black is also beautiful” हे बऱ्याच लोकांच्या पचनी पडत नाही.. लगेच मी selly ला बोलले… So Black is beauty or not ??? आणि एकमेकींकडे बघून हसलोत. कारण त्या मागचं कारणही असच होतं…
4-5 दिवसापूर्वी आम्ही लंच ब्रेक मध्ये गप्पा मारत होतो, बोलता बोलता Selly ने मला विचारल, शमिका, तुला आमच्यासोबत काम करायला आवडतंय का? मी तिला विचारला का गं, असं का विचारतेय ? ती म्हणाली, कारण आम्ही सगळे रंगाने काळी आहोत, गोरी असणारे लोकं आम्हाला कमी समजतात, ते नेहमी आम्हाला आमच्या काळ्या रंगावरून आम्हाला अपमानित करतात, डिवचतात, तुम्हा गोऱ्यांना असं वाटतं कि आम्हाला स्वतःचा स्वाभिमान नसतोच, तुमच्या इतके आम्ही गोरे नाहीत, तुमच्या इतके सुंदर केस सुद्धा आम्हाला येत नाहीत म्हणून विचारल, U are comfortable with us ?…
जरा वाईट वाटलं पण विचार करण्यासारखी गोष्ट हि होती…. “Dissimilate” म्हणजे “वर्णभेद “…जसा जातीभेद, आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या आडनावावरून तो कुठल्या जातीचा आहे, उच्च आहे कि कनिष्ठ जातीचा आहे हे ठरवतो पण वर्णभेदा चं तसं नाहीये, कारण यात आपण त्या व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरून ओळखतो आणि judge करतो..
म्हणजेच जर तो व्यक्ती रंगाने काळा असेल तर मात्र त्याच्यापासून लांब असलेलं बरं….. कारण हा वर्णभेद फक्त काळ्या असण्याऱ्या व्यक्ती पुरताच मर्यादित आहे, माझ्या तरी अजून एखाद्याला त्याच्या गोऱ्या रंगावरून डिवचलेलं ऐकिवातात नाही, असो…
मुद्दा असा कि, काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजेत बसू नयेत, असा समाज आहे पण स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्रात एक तरी काळा मणी असावा असा मात्र हट्ट असतो नाहीतर ते मंगळसूत्र न होता नेकलेस होतो..
इतकंच काय तर काळ्या रंगाचा सुंदरसा ड्रेस परिधान केलेली गोरी मुलगी दिसली किंवा काळ्या रंगाचा कोट घातलेला हँडसम मुलगा असेल तर आपण लगेच त्याची स्तुती करतो पण जर हाच पेहराव रंगाने काळी -सावळी असलेल्या एखाद्या मुलीने किंवा मुलाने केला तर मात्र आपल्या भुवया उंचावतात…का?, आम्हाला काळ्या रंगाचे शुज, सॅन्डल, जॅकेट, कोट, एवढाच नाही तर डोक्यावरचा एखादा केस पांढरा दिसला तरी लगेच आम्ही आमचे संपूर्ण केस काळे करतो, पण आपल्या काळ्या मनाचं, विचारांचं काय जे एखाद्या काळ्या व्यक्तीला त्याचा रंगावरून हिणवतात, डिवचतात.
आपण कितीही चांगला पेहराव केला तरी उपयोग काय त्याचा, मुळात आपले विचारच काळवंडलेले आणि चांगले नसतील तर …जो पर्यंत आमचे विचार आणि आमचं मन स्वच्छ होणार नाही तोपर्यंत हा काळा रंग फक्त रंग न राहता तो एक न पटलेला व्हैयात आणि निर्बुद्ध विचार असेल.
Nelson Mandela, Michel Jordan, barak obama, will smith या प्रतिष्टीत व्यक्ती असल्या तरी याना पण वर्णभेदाला सामोरे जावंच लागलंय पण तरी हि आज संपूर्ण जग त्यांचा आदर करतो.
मला काळा रंग आवडतो कारण हा रंग कुठल्याही रंगात मिसळला तरी हा रंग स्वतःच मूळपणा सोडत नाही तर उलट अजून त्या दुसऱ्या रंगला उठावदार बनवतो म्हणूनच जसे माझ्यासाठी इतर रंग आहे तसा काळा हाही रंगच आहे. मुळात आपण कसं दिसतो यापेक्षा आपले विचार कसे आहेत हे जास्त महत्वाचं आहे कारण आपले विचार या वरूनच आपल्या व्यक्तित्वाची जडणघडण होत असते.
आपल्याला आपल्या चांगल्या विचारसरणीचा, आपल्या दिसण्याचा अभिमान असायला हवा, लोक काय विचार करतात यापेक्षा आपण स्वतः बद्दल काय विचार करतो हे जास्त महत्वाचं असतं आणि या चांगल्या विचारांचाच आपल्या आयुष्यावरहि परिणाम होत असतो.
Selly ला तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होत….मी तिला म्हणाले कि सुरवातीला मी खरंच comfortable नव्हते पण ते यामुळे नाही कि तुम्ही दिसायला काळे आहात म्हणून, तर तुम्ही मला तुमच्यात ऍडजस्ट करून घ्याल कि नाही यामुळे.
तुम्ही रंगाने काळी असली तरी तुमचं मन खूप निर्मळ आणि स्वच्छ आहे. तुमच्यातली सगळ्यात प्रामुख्याने आवडलेली गोष्ट म्हणजे, मी ज्या ज्या काळ्या व्यक्तीला भेटली आहे किंवा भेटतेय मग ती अनोळखी व्यक्ती असूदेत ती प्रत्येक व्यक्ती खूप नम्रपणे आणि आपुलकीने विचारपूस करते, कारण मुळात तुम्ही मनाने “गोरे” आहात…
आणि तुमचा हा विचार प्रत्येक व्यक्तीसाठी सारखाच आहे, त्यात कुठलाही स्वार्थ नाही. मग ती व्यक्ती कुठल्याही रंगाची असू देत.. तुम्हा सर्वाना भेटल्यानंतर या काळ्या रंगा बद्दल आणि तुमच्या व्यक्तित्वाबद्दल आदर जास्त वाढलाय…. त्यामुळे तुम्ही आमच्या गोऱ्या रंगाच्या भानगडीत न पडता उलट आम्ही तुमचे गोरे म्हणजेच चांगले विचार आत्मसात करायला हवेत.
माझ्यासाठी तरी “Black is not just a colour Becoz without black, नो colour has any depth But you mix black With everything, its beauty of that colour means “Black is beautiful ” आणि म्हणूनच तुम्ही आहात म्हणून आमची किंमत आहे.
नाही तर आमच्या पांढऱ्या नाही गोऱ्या रंगाला काडीचीहि किंमत नसती. म्हणूनच तर म्हणतेय जरी “रंग तुझा वेगळा….पण हवाहवासा ” आणि परत हे एकदा मिस युनिव्हर्स “झुझीबीनी तुंझी” आणि मिस वर्ल्ड “टोनी -ऍनसिंग या दोन्ही आफ्रिकन मुलींनी सिद्ध करून दाखवलंय…. कि स्किन colour doesn’t matter.
यावेळी मोहमद्द रफी यांनी गायलेलं आणि गाजलेलं गाणं आठवते…. “हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है…. ”
- शब्दांकन : शमिका खुशाल कारिया