Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्याभावली धरण ओव्हरफ्लो; दारणाही भरण्याच्या मार्गावर

भावली धरण ओव्हरफ्लो; दारणाही भरण्याच्या मार्गावर

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्याची (Igatpuri Taluka) पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या दारणा नदीच्या (Darana River) उगमस्थानी असलेल्या एक हजार तीनशे एकोणपन्नास दलघफू साठवण क्षमता असणारे भावली धरण (Bhavali Dam Overflow) पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहु लागले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका सुखवला आहे…

- Advertisement -

गेल्या आठ दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तालुक्यातील सर्व धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली असून महत्वाचे समजले जाणारे दारणा धरणही (Darna Dam) भरण्याच्या मार्गावर असून,या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे येत्या चार ते पाच दिवस पावसाने मेहेरबानी कायम ठेवली तर दारणा धरण सुद्धा लवकरच भरेल अशी माहिती सेक्टर अभियंता यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, मागील आठ दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने अद्यापही इगतपुरी तालुक्यात उसंत न दिल्याने समाधानकारक होणाऱ्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीची ४७ टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून यावर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील धरण साठ्यात भरमसाठ वाढ झाली असून यातील भावली धरण पूर्णपणे ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे .

दरम्यान, दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येतो. तसेच संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे. यामुळे मागील काही महिन्यात या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने धरणाने तळ गाठला होता. दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते. तर भाम तसेच दारणा धरणही आता लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sinhastha Kumbhamela Review Meeting: नदी प्रदुषण रोखण्यासाठी २९ नाले बंदिस्त करणार;...

0
नाशिक | प्रतिनिधीमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाशिकच्या विकासकामांबद्दल प्रशासन गतीने कामाला लागले असून, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मलजल वाहून नेणारे २९ नाले बंदिस्त करण्याचे नियोजन सुरू...