Sunday, July 21, 2024
Homeनगरलाच घेताना पंचायत समिती सदस्य व तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

लाच घेताना पंचायत समिती सदस्य व तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

- Advertisement -

अठ्ठावीस वर्षीय तक्रारदार यांचे वडील व चुलत भाऊ यांची सात बारावर वारसा हक्काने नोंद घेऊन सात बारा देण्यासाठी आरोपी लोकसेवक तलाठी प्रविण दिलवाले यांनी पंचा समक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी करून 10 हजार रुपये लाच (Bribe) रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच 19 जुन रोजी पंचासमक्ष 10 हजार रुपये लाचेची (Bribe) रक्कम त्यांचे सोबत असलेले खाजगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण यांचेकडे देण्यास सांगितले असता,

खासगी इसम चव्हाण यांनी लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Division) सापळा पथकाने आलोसे तलाठी प्रवीण अशोक दिलवाले (वय 47 रा. वैजापूर, जि छत्रपती संभाजीनगर) व खासगी इसम माजी पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण, (वय 38 रा. काटेपिंपळगाव, ता गंगापूर, जि छत्रपती संभाजीनगर), यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष धस, युवराज हिवाळे, केवलसिंग घुसिंगे, श्री.बागुल, यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या