Thursday, September 12, 2024
Homeशब्दगंधडोंगर-दऱ्या जोडणारे पूल

डोंगर-दऱ्या जोडणारे पूल

– अंजली राजाध्यक्ष

हिमाचल प्रदेशात मुख्य हमरस्ता छक-5 पूर्ण राज्यातून जातो. परंतु वाहतूक तर अनेक डोंगरांत होते व मुख्य रस्त्याला जोडून अनेक रस्ते व पूल जोडलेले आहेत.

- Advertisement -

अतिउंचीवर हिमनद्यांच्या घर्षणाने भुसभुशीत झालेली येथील मृदा आढळते. वर जावे तशी हवा विरळ व बाष्प बिलकूल नाही. पाऊस अत्यल्प, होतो तो फक्त हिमवर्षाव, जो आम्ही किब्बर गावात थोडाफार अनुभवला. उंचावर सरहानपासून वर चढताना, काझा, टाबो, किब्बर येथे छोटी खेडी आढळली. काझाला एका बौद्ध मॉनेस्टरीच्या आसपास चक्रव्यूहासारखी खेड्याची रचना भासली.

येथे खूप ठिकाणी शाळा आहेत, सरकारी कचेर्‍या आहेत, पोस्ट ऑफिस आहे एवढेच नाही तर मतदान केंद्रेही आहेत. दळणवळण हे त्यासाठीच महत्त्वाचे ठरते. कारण या जनतेला अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यास रस्ता हा एकच मार्ग व वाटेत लागणारे डोंगर दर्‍या पार करण्यास पूल हे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरते. आम्हाला ठिकठिकाणी या पुलांचा वापर करून अंतरे पार करावी लागली. काही ठिकाणी या पुलांनी रस्त्याची अंतरे कमालीची कमी केली आहेत. येथील डोंगर भुसभुशीत, माती कोरडी, मग काय तंत्रज्ञान आहे जेणेकरून येथे पूल सहज बांधले जातील व डोंगरतोडही कमीत कमी प्रमाणात होईल? त्याबद्दल पुढील भागात लिहिणार आहे.

क्रमशः

- Advertisment -

ताज्या बातम्या