Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबईत रहिवासी इमारतीला भीषण आग

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईतील (Mumbai) सायन कोळीवाडा भागात इमारतीला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. येथील एका १९ मजली इमारतीच्या सहाव्या माळ्यावर ही आग लागली असून आगीमुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती.

सायन (Sion) कोळीवाडा परिसरात एमए रोडवर ही इमारत असून, ओम शिवशक्ती (Shivshakti) असे त्या इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग (Fire) लागली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे एक जंबो वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या