शेगाव – प्रतिनिधी Shegaon
महाराष्ट्र शासनाच्य (Government of Maharashtra) महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत (Mahatma Phule Farmers Loan Waiver Scheme) कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. शासन आणख किती दिवस चेष्टा करणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
प्रोत्साहनपर अनुदान ३१ मार्चल जमा होणार होते. मात्र, जुलै महिन संपत आला तरी अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. यामुळे प्रोत्साह अनुदान कधी मिळणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कर्जमाफी योजनेची घोषण झाल्यानंतर शासनाने पात्र शेतकऱ्यांच माहिती संकलित केली. प्रोत्साहनाची पहिली यादी जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला. दुसरी याद प्रसिद्ध झाली. मात्र, अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत यामुळे दुसऱ्या,तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांन प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.