Saturday, July 27, 2024
Homeनगर‘पेटा’ हटवा, बैल वाचवा

‘पेटा’ हटवा, बैल वाचवा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

‘पेटा गाडा, बैल सोडवा’, बैलगाडी शर्यती (Bullock cart race) सुरू करा, अन्यायकारक बंदी उठवा (Lift the unjust ban), अशा घोषणांनी शहर दणाणून सोडत राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee at Rahuri) प्रवेशद्वारासमोर बैलगाडा मालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्ते यांनी घोडा व बैलांसह रस्ता रोको आंदोलन (Road block movement with bulls) केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतप्रेमी व शेतकरी सहभागी झाले होते. ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

- Advertisement -

आंदोलनात बैल, घोडा सहभागी झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी राज्य शासनाला (Maharashtra Government) गंभीर इशारा (Hint) देत शर्यतीला परवानगी दिली नाही तर उग्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेतले जाईल, प्रसंगी मंत्रालयावर बैल व घोडा घेऊन आंदोलन हाती घेऊन शासनाला भाग पाडू, पेटा संस्थेने कोणताही विचार न करता अविचारीप्रमाणे बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली. शेतकरी बैलावर कोणताही अत्याचार होऊ देत नाही, असे असताना कोणत्या निकषावर पेटा संस्थेने निष्कर्ष काढत बंदी लादली? असा सवाल केला.

दरम्यान, आंदोलनस्थळी तहसीलदार उपस्थित नसल्याने मोरे यांनी तीव्र शब्दात निषेध करत नाराजी व्यक्त केली. आठ दिवस आधीच आंदोलनाचे निवेदन दिलेले असतानाही तहसीलदार निवेदन घेण्यासाठी हजर नसल्याने गोंधळ झाला. कर्नाटक व तामिळनाडू (Karnataka and Tamil Nadu) राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरु करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी प्रशांत शिंदे, महेश लांबे, रवींद्र हापसे, आरपीआयचे बाळासाहेब जाधव, भागवत डोंगरे यांची भाषणे झाली. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात भंडार्‍याची उधळण करण्यात आली. बैल घोडा रस्त्यावर आणून एक अनोखे आंदोलन पार पडले. आंदोलनकर्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करत होते. काहींनी हलगी ताशाच्या तालावर ठेका धरला होता. आंदोलनात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे, माजी उपाध्यक्ष आर. आर. तनपुरे यांनीही सहभाग नोंदविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या