Saturday, April 26, 2025
Homeनगरझेडपी कर्मचार्‍याचे घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

झेडपी कर्मचार्‍याचे घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला

कल्याण रस्त्यावरील घटना || गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परीषद कर्मचार्‍याचे घर फोडून रोख रक्कम, सोन्या – चांदीचे दागिन्यांसह दोन लाख 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. कल्याण रस्त्यावरील गणेशनगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित अनिलसिंग पवार (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

अभिजित जिल्हा परीषदेत चालक म्हणून नोकरीला आहे. ते 31 मे रोजी ड्यूटीसाठी नाशिक येथे गेले होते. त्यांची पत्नी व मुले 1 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता घराला कुलूप लावून बहिणीकडे मुंबई येथे गेले होते. दरम्यान रविवारी (2 जून) सकाळी 10 वाजता अभिजित त्यांच्या घरी आले असता त्यांना घराला कडी लावलेली दिसली. त्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

त्यांनी घरातील कपाटात पाहणी केली असता सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण, 11 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 ग्रॅमचे सोन्याचे कानातील फुले, सहा भाराचे चांदीचे पैजण व आठ हजाराची रोकड असा दोन लाख 58 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; सरकारचा...

0
दिल्ली । Delhi जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट केलंय. मानवतेला काळिमा...