Sunday, January 25, 2026
Homeक्राईमपती पत्नीच्या तोंडावर स्पें मारून सव्वा तीन लाखांचे दागिने पळविले

पती पत्नीच्या तोंडावर स्पें मारून सव्वा तीन लाखांचे दागिने पळविले

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती पत्नीच्या तोंडावर स्पे मारून त्यांना बेशुध्द करत घरातील आठ तोळे वजनाचे सव्वा तिन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटे एकरुखे शिवारात घडली. याबाबत राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

राहाता पोलिसात बजरंग हरी गाढवे रा. जांभळीचा मळा, रांजणगाव रोड, एकरुखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 11 ऑगस्टच्या पहाटे दिड ते पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमची कडी कोयडा तोडून एक लाख चाळीस हजार रुपयाचे गठंन, एक लाख चाळीस हजार रुपयाची सोन्याची साखळी व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 3 लाख 29 हजार रुपयाचा माल चोरून नेला. चोरट्यांनी बंगल्याचे मालक बजरंग हरी गाढवे व त्यांच्या पत्नी गाढ झोपेत असताना तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले व घरातील आठ तोळे सोन व वापरण्याचे कपडे घेऊन पसार झाले.

YouTube video player

बजरंग गाढवे फिर्यादीवरून राहाता पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिस घटनास्थळी पोहचले. श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे वाहनात बसुन फरार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सपोनि कमलाकर चौधरी करीत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : घुमल्या घोषणा, दाटली गर्दी; नाशिकमधून ‘लाल वादळ’ मुंबईच्या...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha)...