धुळे – Dhule प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील कासारे गावात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कमेसह 68 हजारांच सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चोरीच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून याप्रकरणी साक्री पोलिसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
- Advertisement -
याबाबत विजयाबाई उत्तम देसले (वय 45 रा. कासारे) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी त्याच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातून 50 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार, 10 हजार रुपयांची रोकड आणि 8 हजारांची लहान मुलाची अंगठी असा एकुण 68 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही चोरीची घटना काल दि. 7 रोजी रोजी उघडकीस आली.
याप्रकरणी अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पी. एम. बनसोडे हे करीत आहेत.